@maharashtracity

नवी दिल्ली: भारतीय महिलांना समतेचा पल्ला गाठण्यासाठी बराच अवधी असल्याचे प्रतिपादन कॅनडाच्या दूतावसात वरिष्ठ माहिती अधिकारी आणि जनसंपर्क अधिकारी अर्चना मिरजकर ( Archana Mirajkar) यांनी येथे केले.

रमाई जागृती मंचाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन येथील डॉक्टर आंबेडकर वाटिका, सरोजिनी नगर येथे करण्यात आले, यावेळी भारतस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षात भारतीय महिला कुठे आणि त्यांचे भविष्य या विषयावर मिरजकर बोलत होत्या.

या प्रंसगी रमाई जागृती मंचाच्या जया सूर्या यांनी ध्वज प्रतीक लावून मिरजकर यांचे स्वागत केले, डॉ. कृपाकर वासनिक यांनी त्यांचे ‘बुध्दा जीवन जिने की कला’ हे स्वयं लिखित पुस्तक भेट म्हणून दिले. ऑल इंडिया सिद्धार्थ पेपर सेंटरचे महासचिव सुभाष लोखंडे ( Subhash lokhande) यांनी संस्थेचे त्रैमासिक ‘सम्यक संकल्प’ भेट दिले.

मिरजकर म्हणाल्या, स्त्री पुरुष समानतेमध्ये जागतिक पातळीवर भारताचा 124 वा क्रमांक आहे. त्यांनी इतर देशाच्या तुलनेत भारतातील महिला कुठे आणि कशा मागासलेले आहेत याबद्दल सांगितले.

त्या म्हणाल्या संयुक्त राष्ट्र संयुक्त संघाने वर्ष 2030 पर्यंत स्त्री पुरुष समानता प्राप्त करण्यासाठी काही शाश्वत समतेची मूल्य निर्धारित केलेली आहेत. आपल्या हातात केवळ साडेसात वर्षाचा कालावधी यासाठी उरलेला आहे.

सरकारने नियोजनपूर्वक प्रयत्न करने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जगातील काही देश आपल्या सोबतच स्वतंत्र झाले असून देखील तिथल्या महिलांची स्थिती भारतीय महिलांच्या तुलनेत अधिक सक्षम आहे, यामागचे तिथल्या सरकारांचे प्रयत्न असल्याचे त्यांनी विदित केले. स्त्रीपुरूष समतेसाठी समाजातून आणि सरकारकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे ही त्या म्हणाल्या.

कॅनडा येथे सरकार यासाठी केले जात असलेले विशेष प्रयत्न त्यांनी सांगितले. एखाद्या चर्चा सत्रात केवळ पुरुषच असतील तर अशा कार्यक्रमांना शासकीय उच्चपदस्थ अधिकारी येण्यास नकार देतात याला पॅनल न म्हणता म्यानल म्हणतात.

कामकरी महिलांचे कामाचे तास त्यांचा सोयी ने दिले जातात. सोबतच पुरुषांनाही मुले सांभाळण्यासाठी रोजच्या कामाचे नियोजन योग्य प्रकारे केले जाते. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

रमाई जागृती मंचाच्या या कार्यक्रमात यावेळी विवीध रंजकपूर्वक स्पर्धा झाल्या मिरजकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण ही करण्यात आले.

रमाई जागृती मंचामध्ये मूळ महाराष्ट्रातील पण कामानिमित्त दिल्लीत स्थायीक झालेल्या आंबेडकर समाजातील कामकरी महिला आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here