@maharashtracity

राज्यात ६८६ नवीन रुग्ण

मुंबई: महाराष्ट्रात सोमवारी ६८६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी ६ नोव्हेंबर रोजी राज्यात ६६१ रुग्ण संख्या तर ८ नोव्हेंबर रोजी ७५१ रुग्ण नोंदविण्यात आले होते.

याच दिवशी मुंबईत अनुक्रमे १७६ आणि २०६ एवढी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली होती. असे असताना सोमवारी राज्यात ६८६ तर मुंबईत १८२ रुग्ण संख्या नोंद झाल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरावड्यात निचांकी रुग्णसंख्या नोंदणीची तिसरी वेळ असल्याचे आकडेवारी सांगत आहे.

दरम्यान, आता राज्यातील कोरोनाबाधित (corona patients) रुग्णांची एकूण संख्या ६६,२४,९८६ झाली आहे. सोमवारी ९१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६८,७९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

Also Read: रविकांत तुपकर करणार बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ११,९४३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात सोमवारी १९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,४०,५२,२१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,२४,९८६ (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९,८५९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत तर १०१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात १८२

मुंबईत (Mumbai) दिवसभरात १८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७६०५११ एवढी झाली आहे. तर ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६२९६ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here