Twitter: @maharashtracity
महाड: महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयासमोर (Dr Babasaheb Ambedkar College) एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर एका तरुणाने चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. याप्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा झाला असून हल्ला करणाऱ्या तरुणाचा पोलिस शोध घेत आहेत.
महाडजवळ मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर सकाळी सव्वा अकरा वाजता महाविद्यालयातील १६ वर्षीय तरुणीवर हल्ला होण्याची घटना घडली. हल्ला करणारा तरुण पळून गेला असून त्याचे नाव सारळ सुनील शिंदे असे असून पोलिस (Mahad Police) त्याचा तपास करत आहेत.
जखमी झालेली तरुणी महाविद्यालयात जात असताना तिची वाट अडवून या महाविद्यालयीन तरुणाने धक्काबुक्की करत सोबत आणलेल्या काचेच्या बाटलीने हल्ला केला. यामधे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून महाड शासकीय रुग्णालयात (Mahad Hospital) तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी तरुणावर महाड शहर पोलिस ठाण्यात भादवी कलम ३०७, ३४१, ३५४ अ, १ (१) (२), ३५४ ड, ३२३, ५०४, ५०६, सह बालकांचे लैंगिक अत्याचार सरांक्षण कलम १२, १८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.