@maharashtracity

महाड: नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीमधील सदनिका घेण्यास गेलेल्या एका ग्राहकाला बांधकाम व्यवसायिकाने (builder) लाखो रुपये घेवून देखील सदनिकेचा ताबा न दिल्याने या ग्राहकाने महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार करताच बांधकाम व्यवसायिकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे.

महाड शहर पोलीस (Mahad Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कोटेश्वरी तळे परिसरातील सर्व्हे नंबर १६२४, १६२५, १६२६ मधील मिळकत हि मूळ जागा मालकाकडून विकसित करण्यासाठी घेतली आहे. यामध्ये उभ्या राहणाऱ्या योग सुशीला अपार्टमेंट या इमारतीमध्ये श्रीमती चंदा गोविंद कुडपाने (वय ६५) रा. सुंदरवाडी महाड या वयोवृद्ध महिलेस सदनिका खरेदी करायची होती. त्याकरिता पैसे दिले असता सन २०२० पर्यंत सदनिकेचा ताबा दिला जाईल असे सांगितले.

या व्यवहारापोटी बांधकाम व्यावसायिक योगेश कळमकर रा. महाड याने फिर्यादी यांचेकडून ५४ लक्ष २५ हजार १०० रुपये घेतले. मात्र सदनिकेचा ताबा न दिल्याने आपली आर्थिक फसवणूक (cheating) झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी चंदा गोविंद कुडपाने यांनी बांधकाम व्यावसायिक योगेश कळमकर याच्याविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनुसार योगेश रामचंद्र कळमकर याच्याविरोधात भादवि कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून योगेश कळमकर यांस अटक करण्यात आली आहे. अशी माहिती महाड शहर पोलीस ठाण्याचे तपासिक अमलदार विशाल शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here