@maharashtracity

मुंबई: राज्यात तीव्र उन्हाळा जाणवत असताना व राज्याची विजेची मागणी २७,००० मेगावॅटपेक्षा जास्त असताना महानिर्मितीने (Mahanirmiti) आज पुन्हा एकदा औष्णिक वीजनिर्मितीत ८,००० मेगावॅटचा टप्पा ओलांडला.

आज बुधवारी दुपारी ३.१५ वाजता महानिर्मितीने (Mahagenco) ८,०४५ मेगावॅट औष्णिक वीजनिर्मितीसह (Thermal power generation) एकूण ९,९५२ मेगावॅट वीजनिर्मिती साध्य करून राज्यातील वीजग्राहकांना (power consumers) मोठा दिलासा दिला आहे.

यावेळी चंद्रपूर महाऔ.वि. केंद्रातील २,२१६ मेगावॅट, कोराडी औ.वि. केंद्रातील १,७४९ मेगावॅट, खापरखेडा औ.वि. केंद्रातील १,०२६ मेगावॅट, भुसावळ औ.वि. केंद्रातील १,०७८ मेगावॅट, परळी औ.वि. केंद्रातील ५१२ मेगावॅट, नाशिक औ.वि. केंद्रातील ४७५ मेगावॅट, व पारस औ.वि. केंद्रातील ३९३ मेगावॅट अशी वीजनिर्मिती साध्य झाली.

गेल्या २ महिन्यांपासून महानिर्मितीने सातत्याने उच्चतम कामगिरी नोंदवित वीजनिर्मितीत अनेक उच्चांक नोंदविले आहेत. मुख्य म्हणजे उत्तम कार्यसंस्कृतीच्या माध्यमातून एकूण २७ औष्णिक संचांची उपलब्धतता १००% राहील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. तसेच कोळसा टंचाईच्या (coal shortage) परिस्थितीतदेखील प्रभावी इंधन व्यवस्थापन केल्याने ही विक्रमी कामगिरी शक्य झालेली आहे.

राज्यातील विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray)तसेच ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार महानिर्मितीने मिशन ८,००० मेगावॅट हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे.

महानिर्मितीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल मंत्री डॉ. राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, सर्व संचालक मंडळ व महानिर्मितीचे सर्व अभियंते-तंत्रज्ञ-कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here