@maharashtracity

मुंबई: दुकान किंवा आस्थापना छोटे असो वा मोठे, आता त्यांना मराठीत नामपाटी (Marathi nameplate) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकित याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकिला उपस्थित होते.

या निर्णयाची माहिती देतांना मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) म्हणाले की, याआधी 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकान (shop) व आस्थापना (establishment) यांना मराठी पाटी लावण्यापासून सवलत होती. नियमातच एक पळवाट होती आणि त्याचा फायदा घेऊन छोटे आस्थापना, दुकानदार मराठी पाट्या लावत नव्हते.

देसाई पुढे म्हणाले, आता यापुढे 10 पेक्षा कमी कामगार (workers) असलेल्या दुकान आणि आस्थापना यांनाही मराठी पाट्या लावणे बंधनकारक (mandatory) करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. हा निर्णय राज्यभर लागू करण्यात आला आहे.

ते पूढे म्हणाले की, दोन भाषेत पाट्या असतील तरी चालेल. मात्र, त्यातील एक भाषा मराठी असावी ही अट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here