@maharashtracity
बुलढाणा: शालेय जीवनातच मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून पूर्ण आयुष्यभर बालवाचक चळवळीचा ध्यास घेतलेले, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष नरेंद्र लांजेवार (Narendra Lanjewar) यांचे आज बुलढाणा इथे फुफ्फुसाच्या आजाराने निधन झाले. ते 53 वर्षांचे होते.
बुलढाणा (Buldhana) परिसरात कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय त्यांनी पन्नास ग्रंथालयं (library) सुरू केली. मुलांसाठी फिरती ग्रंथ पेटी हा त्यांचा उपक्रम महाराष्ट्रभर गाजला.
पालक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आजवर त्यांनी दोनशेहून अधिक कार्यक्रम केले होते. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतही ते सक्रिय होते. सामाजिक चळवळीत त्यांचा नियमित सहभाग असायचा.
नरेंद्र लांजेवार यांच्या जाण्याने साहित्य चळवळीतला एक धडपडा कार्यकर्ता गेल्याचं दुःख व्यक्त होत आहे.