@maharashtracity

मुंबई: मुंबई डेंजर झोनच्या (danger zone) बाहेर आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. विरोधक उगाच अर्थाचा अनर्थ करून गैरसमज पसरवत आहेत. मात्र ‘लॉकडाऊन’ या (lockdown) शब्दापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्यावी. कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केले आहे.

मुंबईत २० हजारपेक्षाही जास्त कोविड रुग्ण (covid patients) एका दिवसात आढळून आले आहेत. मात्र त्यापैकी १७ हजार नागरिकांमध्ये कोविडची लक्षणे नाहीत. विविध रुग्णालयात (Hospitals) फक्त १६ टक्के बेडवर रुग्ण दाखल आहेत.

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा (third wave of corona) मुकाबला करण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रत्येकाने कोविड नियमांचे पालन करावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर कोविड वाढणार नाही. तसेच, लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही, असे महापौरांनी म्हटले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी वांद्रे येथील बीकेसी कोविड सेंटरची (BKC Jumbo Covid Center) पाहणी करून तेथील कोविड रुग्ण, आरोग्य सुविधा यांचा आढावा जाणून घेतला. यावेळी, त्यांनी कोविड सेंटरमधील डॉक्टरांशी चर्चा केली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी, बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे हे उपस्थित होते.

बीकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये पालिकेने २ हजार ५०० बेडसची व्यवस्था केली आहे. त्यापैकी ८९० ऑक्सिजन बेड्स (oxygen beds) तर १ हजार ३०० बेड्स विना ऑक्सिजन आहेत. मात्र आजच्या तारखेला बीकेसी कोविड सेंटरमधील आयसीयू बेडवर (ICU bed) एकही कोविड रुग्ण नाही, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी तेथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सांगितले.

महापौर विरोधकांवर बरसल्या

मुंबईत कोविडची वाढती लोकसंख्या पाहता मी फक्त ‘मिनी लॉकडाऊन’ बाबत जर तरच्या अनुषंगाने केवळ भाष्य केले होते. लॉकडाऊन होणारच, असे मी म्हटले नव्हते. आम्हाला नागरिकांना उगाच घाबरवायचे नाही. मात्र त्याबाबत विरोधकांनी अर्थाचा अनर्थ करून चुकीचे मेसेज नागरिकांमध्ये जाणीवपुर्वक पसरवले. नागरिकांना नाहक उकसवत आहेत. विरोधक कोविडच्या नावाखाली घाणेरडे राजकारण करीत आहेत, असा आरोप करीत महापौर विरोधकांवर चांगल्याच बरसल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here