@maharashtracity

मुंबई: लातूर शासकिय महाविद्यालयात मायक्रोबायलॉजी-१ च्या सराव परिक्षेला आलेली प्रश्नपत्रिका शुक्रवार दिनांक ११ मार्च रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेला आल्याने या विषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने घोषित केले. मात्र, या विषयाची पुनःपरिक्षा घेऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच सही मोहिम (Signature campaign) राबवली.

या सही मोहिमेत ४ हजार २४९ विद्यार्थ्यांनी विरोध केल्याचे दिसून येत आहे. तरीही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MHSU) यावर ऑनलाईन फॉर्म प्रकाशित करणार असून या फॉर्ममध्ये परिक्षा घ्यावी कि घेऊ नये असा प्रश्न विचारण्यात येणार आहे. यात अगदी एकाही विद्यार्थ्यांचे परिक्षा व्हावी असे उत्तर आल्यास परिक्षा घेतली जाणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र विद्यापीठाच्या या तोडग्यावरून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

मायक्रोबायलॉजी -१ विषयाचा पेपर (exam of microbiology) घ्यावा कि घेऊ नये यावर विद्यापीठाची आणि एमबीबीएस विद्यार्थ्यांची (MBBS students) मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत ऑनलाईन फॉर्मबाबत सांगण्यात आले. मात्र, बैठकीतील ठरावानुसार राज्यात एमबीबीएसचे ६ हजार ४१ विद्यार्थी असून हे सर्व पुनर्रपरिक्षेला विरोध करत आहेत. पेपर घेऊ नये यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलनही झाले आहे.

लातूर शासकिय महाविद्यालयात (Latur government medical college) मायक्रोबायलॉजी -१ च्या सराव परिक्षेला आलेली प्रश्नपत्रिका अपघाताने आली असून पेपर फुटल्याची घटना घडली असती तर विद्यार्थ्यांनी तसे लक्षात आणून दिले असते. त्यामुळे घटना अपघाताने घडली असल्याचे मत विद्यार्थी मांडत ओहत. तसेच पुनर्रपरिक्षचा ऑनलाईन फॉर्म चाचपणी मतात एखाद्या विद्याथ्याने होकार दिल्यास उर्वरित ६ हजार ४० विद्यार्थ्याना नाहक परिक्षेला सामोरे जावे लागणार असल्याचे मत विद्यार्थी मांडत आहेत. त्यामुळे या विषयातील पुनः परीक्षेवरून विद्यार्थी गोंधळात पडले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here