@maharashtracity

सचिवांनी केलेल्या अपमानाचा बदला कामाच्या असहकारातून

मुंबई: महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या प्रमुख मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील वैद्यकीय शिक्षक (medical teachers) असहकार पुकारणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले.

यात राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (government medical colleges) वैद्यकीय शिक्षक शासकीय कामांवर बहिष्कार टाकणार असून पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थांचे शिक्षण वैद्यकीय शिक्षक यापुढे करणार नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संघटनेकडून करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये प्राध्यापक डॉक्टराना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या सचिवांची बदली करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच दंत वैद्यक, नर्सिंग, बीपीएमटी, डीएमएलटी, सीसीएमपी यासारख्या अभ्यासक्रमाचे अध्यापन करणार नसल्याचे सांगण्यात आले. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाकडून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय परिक्षा घेणार नसल्याचे सांगण्यात आले.

वैद्यकीय अधिक्षक, उपवैद्यकीय अधिक्षक, कुलमंत्री, विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्रालय) व हाफकीन, प्रवेश प्रक्रियेचे कार्य करण्यास संघटनेने नकार दिला आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग व एलआयसीच्या (LIC) तपासण्यामध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षक संघटनेकडून घोषित करण्यात आला आहे.

अस्थायी सहाय्यक प्राध्यापक यांच्या सेवा नियमित करणे, सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते देणे, कंत्राटीकरणाचा शासकीय निर्णय रद्द करणे, अपमानास्पद वागणुक देणाऱ्या सचिवांची बदली करावी अशा मागण्या करण्यात आल्या असल्याचे संघटनेचे सचिव डॉ समीर गोलावर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here