@maharashtracity

सेव्हनहिलमध्ये आतापर्यंत बाराशे रुग्णांवर मोनोक्लोनल अँटिबडी उपचार

मुंबई: कोरोनावरील अनेक उपचारात मोनोक्लोनल उपचार पद्धती (monoclonal treatment) वरदान ठरत असून त्याचा दुष्प्रभाव कमी दिसून येत आहे. दरम्यान, कोविड रुग्णांवर उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या सेव्हन हिल रुग्णालयात (Seven Hills Hospital) आतापर्यंत बाराशे रुग्णांवर या पद्धतीने उपचार झाले असल्याचे सांगण्यात आले. हे यशस्वी उपचार असल्याचे निकाल हाती येत आहेत.

यावर बोलताना सेव्हन हिल रुग्णालयचे अधिष्ठाता डॉ . बाळकृष्ण अडसूळ (Dr Balkrishna Adsul) यांनी सांगितले कि, सेव्हन हिल रुग्णालयात दुसऱ्या लाटेपासून मोनोक्लोनल अँटिबाडी उपचार पद्धती वापर सुरु करण्यात आले. आतापर्यंत १२०० ते १३०० रुग्णांवर उपचार करण्यात आले.

भारतीय औषध नियामक प्राधिकारणाने (Drugs Control Authority of India) नेमून दिलेल्या अटीनुसार या पद्धतीने उपचार केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज हे कृत्रिम अँन्टीबॉडीज असून नैसर्गिक अँन्टीबॉडीज (natural antibodies) प्रमाणेच निर्माण करुन रुग्णाला इंजेक्शन स्वरुपात दिले जाते.

हेे नैसर्गिक प्रतिपिंडांप्रमाणे असून शरिरातील विषाणू किंवा जीवाणूच्या हल्ल्याविरोधात लढण्यास ही थेरपी मदत करते. हे अँटीबॉडी प्रयोगशाळेत निर्माण केले असून विशिष्ट रोगाला लक्ष्य करण्याच्या उद्देशातून त्याची रचना तयार केलेली असते.

दुसऱ्या लाटेच्या दरम्यान मे महिन्यात भारताच्या औषध नियामक प्राधिकारणाने कॅसिविरीमॅब आणि इमंडेव्हीमॅब कॉकटेलल थेरपीला आपत्कालीन मान्यता दिली. या पद्धतीच्या उपचारात वयोवृद्ध आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, विद्यमान फुफ्फुसाचा आजार सारख्या उच्च जोखीम घटक असलेल्या कोविड -१९ रुग्णांचा समावेश कऱण्यात आला.

डॉ अडसूळ यांनी सांगितले कि, ४० वर्षावरील रुग्णांवर याचा उपचार केला जातो. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्या रुग्णांवर ही थेरपी वापरतात. तसेच सिटीस्कॅन स्कोअर ११ हून कमी तसेच ज्या रुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम संसर्ग आहे तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही अशांवर देखील याचा वापर केला जात आहे.

दरम्यान आयसीयू किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांवर मोनोक्लोनल थेरपी उपचार केला जात नसल्याचे डॉ. अडसूळ यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here