@maharashtracity
जागतिक कर्करोग दिन विशेष
मुंबई: राज्यात २०१८ ते २०२० या तीन वर्षात एकूण २५ हजार २८४ जणांचा कर्करोगाने मृत्यू झाला असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दिली.
कोरोना काळ नुकताच सुरु झालेल्या कालावधीत देखील हि आकडेवारी अधिक असल्याचे दिसून येत आहे. २०१७-१८ या वर्षात ७८५०, २०१८-१९ या वर्षात ८७०० , तर २०१९-२० या वर्षात ८७३४ एवढे मृत्यू झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या तिन्ही वर्षात कर्करोगाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढती असल्याचे ४ फेब्रुवारीच्या जागतिक कर्करोग दिनी समोर येत आहे.
मात्र, कर्करोगाच्या शेवटच्या पातळीवर रुग्ण उपचार करण्यास आल्यास मृत्यूसंख्या वाढण्याची अधिक शक्यता असल्याचे राज्य कर्करोग नियंत्रण उपक्रमाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. तसेच कर्करोग नियंत्रण थीमप्रमाणे निदान, उपचार आणि जागरुकता हे उपकम सुरु असल्याचेही अधिकारी म्हणाले.
यावर बोलताना राज्य आरोग्य विभाग सहसंचालक आणि कर्करोग नियंत्रण उपक्रम प्रकल्प अधिकारी डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले की, सरकारी उपकमातून कर्करोगाबद्दल जागरुकता वाढविण्यात येत आहे. कर्करोगाचे निदान करून उपचार देण्यावर भर दिला जात आहे. रुग्णांचे आयुष्य वाढवणे हा उद्देश आहे. मात्र काही रुग्ण शेवटच्या क्षणी येतात. उशिरा निदान झाल्यास मृत्यू प्रमाण वाढते.
प्राथमिक पातळीवर असलेल्या रुग्णांचे निदान झाल्यास त्वरित उपचार सुरु केले जातात. सध्या निदान, उपचार आणि कर्करोगाबाबतची जागरुकता हे उपकम सुरु असल्याचे डॉ. जोगेवार म्हणाल्या.
जिल्हा २०१७-१८ १८-१९ १९-२०
अहमदनगर ३८२ ३४९ ३६०
अकोला १८३ १६७ ११५
अमरावती ३३४ ३८९ ३३३
औरंगाबाद २४७ २६८ २१९
भंडारा २७५ २८० ३४८
बीड ९९ १७३ १६२
बुलढाणा १०४ ९१ १३१
चंद्रपूर ३१८ ३५८ ३४७
गोंदिया ३॰९ २८३ २९३
हिंगोली ७० १३२ ८७
जळगांव २८६ ३३७ ३०६
जालना ४३ ९९ १५
कोल्हापूर ४४३ ५०१ ५१७
लातूर २५३ २२७ २१६
नागपूर ३३८ ३६७ ३९८
नांदेड १९२ २०७ १५२
नंदूरबार १७७ १७५ १८८
नाशिक ४०६ ३४० ४०३
उस्मानाबाद १४३ १७१ १८२
पालघर १४९ १७१ १७५
परभणी १९८ १५७ १५४
पुणे २४६ ४८२ ३८८
रायगड २०२ १९७ २१५
रत्नागिरी २२४ २६५ ३४०
सांगली २९३ ३६७ ३२८
सातारा ४५७ ४४५ ३८२
सिंधुदूर्ग २४५ २८५ २५५
सोलापूर २६४ ३१३ ३११
ठाणे ६९ ८४ २४८
वर्धा १७६ १८८ २४७
वाशिम ४९ ९८ ९४
यवतमाळ २८२ ३१४ ३०७
एकूण ७८५० ८७०० ८७३४