@maharashtracity

१५ ते १८ वर्षीय मुलांच्या लसीकरणासाठी सोमवारपासून २०० लसीकरण केंद्र

मुलांसाठी २०९ लसीकरण केंद्र होणार

मुंबई: मुंबईतील १५ ते १८ वयोगटातील ९ लाखांपेक्षाही जास्त संख्या असलेल्या मुलांचे ९ केंद्रांवर लसीकरण (vaccination) सुरू आहे. आतापर्यंत ५८ हजार ६७८ मुलांना कोवॅक्सिनचा (covaxin) पहिला डोस देण्यात आला आहे. मात्र, नियोजित लक्ष्य २८ दिवसांत गाठण्यासाठी व लसीकरणाला गती देण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणा आणखीन २०० लसीकरण केंद्र नव्याने सुरू करणार आहे.

कोविड (covid), ओमायक्रॉन (Omicron) विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाने मुंबई महापालिकेने ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू केले आहे. त्यामुळे या १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोविडच्या संसर्गापासून मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, राज्य सरकार व मुंबई महापालिकेचे टेन्शन कमी होण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारने कोविड -१९ (covid-19) पासून संरक्षण होण्यासाठी लसीकरण मोहीम (vaccination drive) राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीमेचा शुभारंभ झाला.

Also Read: मुंबई मनपात शिवसेनेकडून यापुढे फक्त तरुणांना संधी?

अगोदर कोविडचा मुकाबला करणाऱ्या हेल्थकेअर वर्कस (Healthcare workers), फ्रंट लाईन वर्कस (front line workers) यांना लसीचे डोस देण्यात आले. मात्र आता १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीचे डोस देण्याची मागणी वारंवार झाल्याने केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाने मुंबईत ३ जानेवारी २०२२ पासून ९ लसीकरण केंद्रांवर सदर मुलांना लसीचे डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या वयोगटातील तब्बल ९ लाख २२ हजार ५१६ मुलांना फक्त ९ लसीकरण केंद्रांद्वारे लसीचे डोस देणे शक्य नव्हते. त्यामुळे आता पालिकेने आणखीन २०० नवीन लसीकरण केंद्र येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा व लसीकरण लक्ष्य गाठण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here