@maharashtracity

१ हजार कुटुंबियांचे अर्ज पात्र

मुंबई: कोरोनामुळे (corona) मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर मुंबई महापालिकेकडे (BMC) पाच हजार अर्ज प्राप्त झाले असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले.

या पाच हजार अर्जांपैका एक हजार अर्जदार पात्र ठरले असून ही यादी राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याचे ही यावेळी सांगण्यात आले. अद्यापही अर्ज येण्याची प्रक्रिया सुरु असून प्रत्येक अर्जाची छाननी करुन पात्र अर्ज राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहेत.

दरम्यान, मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत १६ हजार ३६५ जणांचा मृत्यु झाला आहे. या कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदत मिळावी म्हणून अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत मुंबई महापालिकडे आतापर्यंत पाच हजार अर्ज प्राप्त झाले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना राज्य सरकारने ५० हजारांची मदत करणार असल्याचे जाहीर केले. (compensation to deceased covid patients) यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या अर्जांची पडताळणी करत आहे. तसेच निकषात बसणारे अर्ज राज्य सरकारकडे पाठविण्याचे काम सुरु आहे.

मुंबई महापालिकेने मंजूर केलेल्या अर्जदारांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. पालिकेने मंजूर केलेल्या अर्जदाराच्या बॅंक खात्यात राज्य सरकार पैसे जमा करणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here