@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी १३,८४० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७७,८२,६४० झाली आहे. शुक्रवारी २७,८९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ७४,९१,७५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२६ % एवढे झाले आहे. तसेच राज्यात आज रोजी एकूण १,४४,०११ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर शुक्रवारी राज्यात एकहीओमायक्रॉन रुग्ण (omicron patient) आढळलेला नसल्याचे सांगण्यात आले.

राज्यात शुक्रवारी ८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५२,५४,८७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,८२,६४० (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५२,४१९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ८४६ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ८४६ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,४९,२७६ रुग्ण आढळले. तसेच ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६५४ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here