@maharashtracity

मुंबई: राज्यात जानेवारी महिन्यात १०५२ मृत्यू झाले असून यातील ४५० मृत्यू न्यूमोनिया (pnuemonia), श्वास घेण्यास त्रास होणे, यातून झाले. तर ६५ टक्के मृत्यूमध्ये सहव्याधी असल्याचे दिसून आले. यातील ५८ रुग्ण सुरुवातीला लक्षणरहित होते. मात्र कोरोना (corona) संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात लक्ष न दिल्याने सहव्याधी आणि ज्येष्ठ रुग्ण दगावल्याची अनेक उदाहरण आहेत.

रुग्ण लक्षणरहित असल्यास त्यांना मॉनिटर करणे आवश्यक झाले असल्याचे कोरोना मृत्यू निरीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे (Dr Avinash Supe) यांनी सांगितले.

दरम्यान, आतापर्यंत ओमिक्रोन (Omicron) हा घसा- नाकाचा आतील भागात बाधित करत असल्याचे समोर आले. श्वसन यंत्रणेच्या (Respiratory system) भागाला बाधित करत नाही असा समज आहे. तिसऱ्या लाटेत ४५ टक्के म्हणजे ४५० मृत्यू श्वसन यंत्रणेला संसर्ग होऊन झाले आहेत. हे मृत्यू डेल्टा कि ओमिक्रॉनमूळे याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

शिवाय सहव्याधी रुग्णांना त्रास होऊन मृत्यू होत आहेत. त्यामुळे अशी तक्रार असल्यास मॉनिटर करण्याचा इशारा डॉ. सुपे यांनी दिला आहे. वयस्कर नागरिकात लक्षण दिसली नाही तरी मॉनिटर करणे गरजेचे आहे. सौम्य लक्षण असली तरी बेफिकिर राहू नका, असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here