@maharashtracity
मुंबईत कमाल तापमान उच्चांकी
मुंबई: मुंबई उपनगरातील कमाल तापमान ३८.९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. या मौसमातील कमाल तापमानाचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. ही या मोसमातील सर्वाधिक तापमान नोंद होती.
राज्यात विविध ठिकाणी कमाल तापमानाने (temperature) उच्चांक गाठला होता. यात मुंबई उपनगर आघाडीवर होते. मुंबई ३८.९, रत्नागिरी ३६.४, सोलापूर ३६.२, डहाणू ३५.८, मालेगाव ३५.६, ठाणे ३५.६, परभणी ३४.७, पुणे ३४.६ अशी नोंद करण्यात आली. दरम्यान, गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला आहे.
कोकण, गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.