@maharashtracity

मुंबईत कमाल आणि किमान रेकॉर्डब्रेक घटले

मुंबई: मुंबई (Mumbai) शहरातील किमान तापमान सोमवारी १६.२ उपनगर १५.० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. त्याचवेळी उपनगरातील कमाल तापमान २४.८ अंश सेल्सिअस तर शहरात २४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले.

कमाल आणि किमान दोन्ही तापमाने घसरल्याने मुंबईत गारठा (cold in Mumbai) पडला होता. तर गेल्या दहा वर्षात जानेवारी महिन्यात कमाल तापमान घसरल्याची रेकॉर्ड ब्रेक नोंदही करण्यात आली.

दरम्यान, मुंबईत सोमवारी दिवसभर कमालीचा गारठा होता. यात वांद्रे १७.४, भायखळा १६.५, जूहू १६.३, महालक्ष्मी १७.३ तर विक्रोळी १६.३ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदवून आघाडीवर होते. हवेत गारठा असल्याने लोकल, बसमधील खिडक्या बंद करण्यावर प्रवाशांनी भर दिला होता.

घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांनी स्वेटर, जॅकेट, कानटोप्यांचा आधार घेतल्याचे चित्र होते. तर मुंबई शेजारील डहाणूतील कमाल तापमान २२.५ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. गेल्या दहा वर्षांत डहाणूतही जानेवारी महिन्यातील कमाल तापमानातील ही नीचांकी नोंद ठरली.

मालेगावातही कमाल तापमान २० अंश सेल्सिअस एवढे खाली सरकल्याने मालेगावातही (Malegaon) जानेवारी महिन्यातील सर्वात कमी कमाल तापमानाची सोमवारी नोंद झाली. तसेच अलिबागमध्ये (Alibaug) ही पहिल्यांदाच जानेवारी महिन्यात कमाल तापमान २४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच एवढा पारा खाली सरकला गेल्याचा नवा रेकॉर्ड झाला.

माझगावतील हवेचा दर्जा खालावला

मुंबईत गुलाबी गारठा पडला असताना येथील हवेचा दर्जा रविवारच्या तुलनेत सोमवारी आणखी खालावला असल्याचे ‘सफर’ कडून सांगण्यात आले. सोमवारी शहर आणि उपनगरातील हवेच्या दर्जाच्या निर्देशांकात माझगावातील हवा सर्वात निकृष्ट असल्याचे नोंद झाली.

माझगावातील हवेचा दर्जा गुणवत्ता निर्देशांक ६०८ एवढा होता. तर चेंबुर ६०१, कुलाबा ५४४, भांडूप ४९४, अंधेरी ४९३, मालाड ४८०, बोरिवली ४६८, बीकेसी ४४५, तर वरळीतील हवा दर्जा निर्देशांक ४२५ एवढा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here