@maharashtracity
धुळे: एक मद्यपी दारुच्या नशेत बडबडला आणि त्याच्यासह दोघे साथीदार थेट खूनाच्या गुन्ह्यात गजाआड झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यात घडली.
पत्नीशी अनैतिक संबंधाच्या (immoral relationship) संशयावरुन साथीदारासह दोघांनी शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील एका इसमाचा खून केल्याची माहीती समोर आली. सध्या दोघांनाही पोलिसांनी (Police) अटक केली असून मृतदेह ही पोलिसांना मिळून आला आहे.
साहेबराव उर्फ सायबू भिमराव मोरे (वय 42, वालखेडा ता.शिंदखेडा) याला गावातीलच मंगा उत्तम मोरे व चेतन बारकू मोरे या दोघांनी दि. 4 मार्च रोजी रात्री दहा वाजता अकिल पिंजारी याच्या शेताकडे नेले. यावेळी मंगा मोरे याने सायबूला तुझे माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध आहेत, असे म्हणत वाद घातला. तर चेतन मोरे याने दोन लाखांसाठी वारंवार तगादा लावतो म्हणून सायबूला शिवीगाळ करीत मारहाण केली.
या मारहाणीत साहेबरावचा मृत्यू झाला. यानंतर दोघे गावात परतले. काही घडलेच नाही, अशा आर्विभावात ते फिरत होते. परंतू, रविवारी चेतन मोरे हा एका हॉटेलात दारूच्या नशेत सायबूच्या माहारणीबद्दल बडबडला. हॉटेलातील एका व्यक्तीने ते एकले. यानंतर त्याने सोनगीर पोलिसांना ही माहीती कळविली. सोनगीर पोलिसांनी तातडीने चेतनला ताब्यात घेतले.
मात्र, घटनास्थळ हे नरडाणा पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने सोनगीर पोलिसांनी नरडाणा पोलिसांना माहीती दिली. यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांनी चेतनला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहीतीवरुन मंगा मोरेला वालखेडा गावातून ताब्यात घेतले. यावेळी दोघांनीही खूनाची कबूली दिली. तसेच घटनास्थळी नेऊन सायबू मोरेचा मृतदेहही दाखविला. या प्रकरणी मयताची आई विमलबाई भिमराव मोरे (वय 70) हीची फिर्याद नोंदवून घेत मंगा मोरे, चेतन मोरे या दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला.