@maharashtracity

मुंबई: संपूर्ण भारतातील कर्करोगासंबंधित उपचारांमध्ये (cancer treatment) सुधारणा आणण्यासाठी नॅशनल कॅन्सर ग्रिड (NCG) ने डिजिटल तंत्रज्ञान आणि अनेक अद्ययावत साधनांचा वापर करण्याचा ठरवले आहे. यामुळे देशभरातील कर्करुग्णांचा वैद्यकीय अहवाल एका क्लिकवर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या डिजिटलाईज साधनांचा मोठा फायदा कर्करुग्ण तज्ज्ञांना तसेच रुग्णांना देखील होणार आहे. कर्करुग्णांच्या डिजिटल ऑन्कोलॉजीसाठी (digital oncology of cancer patients) कोईटा केंद्राची स्थापना केली असून कोईटा फाऊंडेशन यासाठी मदत करणार आहे. आगामी पाच पाच वर्ष हे केंद्र एनसीजीला मदत करणार असल्याचे टाटा मेमोरियल रुग्णालय (Tata Memorial hospital) प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, कोईटा सोबत झालेल्या कराराची माहिती टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली. यामुळे देशातील सुमारे २७० केंद्र जोडली असल्याने देशातील कर्करुग्णाला याची मदत होणार आहे. मुंबईतील तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला हवा असल्यास डिजिटल व्यासपीठावरुन मिळू शकणार आहे.

एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्याइतपत गंभीरता आहे की नाही, किंवा आजारांतील गंभीरता किती आहे अशी सर्व इत्यंभूत माहिती अपलोड केलेल्या अहवालावरुन मिळणार आहे. यामुळे आजाराचे निदान आणि उपचार सोप्या आणि सहज पद्धतीने होणार आहे. कोईटा डिजिटल आरोग्यातील सर्वोत्तम पद्धती अवलंबण्यासाठी तसेच डिजिटल आरोग्य साधनांचा अवलंब करण्यासाठी आणि ईएमआरचे अवलंबन, आरोग्य सेवेच्या अहवालाची देवाण-घेवाण, रिपोर्टिग आणि विश्लेषणासह अनेक सामान्य तंत्रज्ञान उपक्रमांना चालना देण्यासाठी मदत करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावर बोलताना एनसीजीचे संयोजक डॉ. सी. एस. प्रमेश यांनी सांगितले की, एनसीजीअंतर्गत कोईटा डिजीटल ऑन्कोलॉजी केंद्रांची मोठी मदत होणार असून हे नवीन केंद्र भारतातील २७० एनसीजी रुग्णालयांमध्ये समन्वय साधणार आहे. कर्करुग्णावरील उपचार सहज आणि परवडणारे ठरणार असल्याचे डॉ. प्रमेख म्हणाले.

देशातील कर्करोगाच्या जागरुकतेमध्ये सुधारणा करण्यात येईल. तसेच केसीडीओ आणि एनसीजी रुग्णालयांना आयुष्मान भारत डिजिटल मिशन अवलंब करण्यात कदत करु शकणार असल्याचे कोईटा फाऊंडेशनचे संचालक रिजवान यांनी सांगितले.

“कोईटा सेंटर फॉर डिजीटल ऑन्कोलॉजी हा उपयुक्त उपक्रम असून यामुळे कर्करुग्णालये, कर्करुग्ण तज्ज्ञ, संस्था तसेच कर्कविकारावरील संशोधन संस्थांमध्ये साखळी तयार होईल. भविष्यात याचा परिणाम सकारात्मकच असेल.”

  • डॉ. राजेंद्र बडवे,
    संचालक, टाटा मेमोरियल हॉस्पिटल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here