@maharashtracity

धुळे: बनावट कोरोना लसीकरण प्रमाणपत्र (fake corona vaccination certificate) प्रकरणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक वसीम बारी (NCP Corporator Waseem Bari) रविवारी पोलिसांना शरण आला. यापूर्वी आठ जणांना अटक झाली आहे. यातील सात जणांची जामीनावर सुटका झाली आहे.

महापालिकेच्या मोहाडी उपनगर येथील लसीकरण केंद्रात सुमारे 3 हजार 191 नागरिकांचे बनावट लसीकरण झाले आहे. या प्रकरणी आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांच्यासह आठ जणांना अटक झाली होती. याच प्रकरणात पोलीस तपासात राष्ट्रवादीचे नगरसेवक वसीम बारी याचा सहभाग उघड झाला होता.

अटक टाळण्यासाठी वसीम बारी व समद पठाण यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर दोन फेब्रुवारीला दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. आठ फेब्रुवारीला समद पठाणला अटक झाली. आता अटक होण्यापासून आपली सुटका नाही, असे लक्षात आल्याने नगरसेवक बारी रविवारी पोलिसांना शरण आला. या प्रकरणात बारी हा अटक होणारा नववा आरोपी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here