Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यात रविवारी १६ तर मुंबईत ३ गोवर रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे राज्यात आता एकूण ८२३ तर मुंबईत ३८६ गोवर रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात १२ हजार ८४१ तसेच मुंबईत ४ हजार ५०८ संशयित रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. राज्यात गोवर प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर भर देण्यात आला असून अतिरिक्त लसीकरणही करण्यात येत आहे.

मुंबईत एम पूर्व, एच पूर्व अशा एकूण १६ वॉर्डात प्रामुख्याने गोवर बाधितांची संख्या आहे. तर राज्यात मालेगाव मनपा क्षेत्र, भिवंडी, ठाणे शहर अणि ग्रामीण, वसई, विरार, पनवेल, नवी मुंबई मनपा, मीरा भाईदर, हे एमएमआर क्षेत्रातील परिसर गोवर उद्रेक ठिकाणे आहेत. तसेच औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, बुलढाणा, रायगड, जळगाव, धुळे मनपा तसेच धुळे ग्रामीण भागातही गोवरचे रुग्ण आढळत आहेत. या ठिकाणी संशयित गोवर रुग्णांची संख्या ५० हून अधिक असल्याचे नोंद आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here