मुंबई
कोणताही ग्रह दुसऱ्या राशीत एका निश्चित वेळेत गोचर करतो आणि जेव्हा हे घडतं तेव्हा याचा प्रभाव सर्व राशींवर होतो. हे गोचर काही राशींसाठी लाभदायक असतं तर काही राशींसाठी नकारात्मक. (In the new year 2024 the wishes of these three zodiac signs will be fulfilled) तर साहस, पराक्रम आणि बुद्धीचा करक मानला जाणारा मंगळ हा धनु राशीत गोचर करणार आहे. मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. जाणून घेऊया नवं वर्ष कोणत्या राशींसाठी लाभदायी ठरेल.
या तीन राशींच्या लोकांना मिळेल यश
मेष राशी – मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचा धनु राशीच गोचर करण्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. साहस आणि पराक्रमात वाढ होऊ शकते. नव्या वर्षाच्या सुरुवातीला आत्मविश्वास वाढीस लागले. नशीब तुमच्यासोबत असेल, कारण प्रत्येक कार्यात यश मिळेल.
सिंह राशी – या राशींसाठी मंगळ ग्रहाचा धनु राशीत गोचर केल्यामुळे सकारात्मक परिणाम दिसेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. जर तुम्ही जमीन वा वाहन खरेदी करू इच्छित असेल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही आनंदी राहाल आणि वैवाहिक जीवही चांगलं राहील.
कन्या राशी – या राशींसाठी 2024 हे नवं वर्ष मजेशीर ठरणार आहे. इच्छेनुसार लाभ होईल. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करीत आहेत, त्यांना यश मिळण्याची अपेक्षा आहे. नोकरदार वर्गाच्या लोकांना आवडीनुसार ट्रान्सफर किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांचं आरोग्यही सुदृढ राहणार आहे.