@maharashtracity

वॉर रुम, जंबो केंद्रांना सज्जतेच्या सुचना

पालिकेने चाचण्या वाढवल्या

मुंबई: कोणत्याही व्हायरस चा इन्क्युबेशन काळ हा २१ दिवासांचा असतो. त्यामुळे २४ नोव्हेंबरपासून नमुने घेण्यास सुरुवात झालेल्या परदेशी प्रवाशांमध्ये आगामी १५ दिवसात कोविड बाबतची प्रगती दिसून येईल. तोपर्यंत परदेशातून आलेल्या प्रवाशांचे नमुने तपासले जात आहेत.

कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे नमुने जिनॉम सिक्वेन्सिंगसाठी जात आहेत. त्यांचे अहवाल टप्प्याटप्प्याने येणार आहेत. मात्र आगामी १५ दिवस मुंबईसाठी परिक्षेचे असून प्राप्त होणाऱ्या अहवालांवर पुन्हा पुढील नियोजन अवलंबून असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

दरम्यान, ओमिक्रॉन वेरियंटच्या (Omicron variant) पार्श्वभूमीवर नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत अद्याप ओमिक्रॉन संसर्गित रुग्ण आढळला नसल्याचे काकाणी सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशातून येत असलेल्या रुग्णांची कसून तपासणी केली जात आहे.

चाचण्या आणि नमुन्यांचे निदान यापुढे येत राहील. मात्र आगामी पुढील १५ दिवस महत्त्वाचे असल्याचे काकाणी म्हणाले. पॉझिटिव्ह आढल्यास त्या रुग्णांचे नमुने जीनोमिक सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) लॅबमध्ये पाठवले जात आहेत.

Also Read: वरळी दुर्घटनेतील जखमींवर उपचारात दिरंगाईचा आरोप ; चौकशीचे आदेश

प्रवाशांची संख्या वाढती असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी पालिकेने पंचतारांकित हॉटेल्सची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांना अलगीकरणात (quarantine) ठेवण्यात येणार आहे. तसेच ओमिक्रॉन वेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई क्षेत्रातील सर्व विभाग कार्यालयांना आणि वॉर रूम (War room), रुग्णालये (Hospitals) आणि जंबो केंद्रांना (Jumbo Covid Centers) सतर्क करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल (BMC Commissioner IS Chahal) यांनी अधिकाऱ्यांना ५० हजार नमुन्यांची दैनंदिन चाचणी वाढवण्याचे आदेश दिले आहेत. ओमिक्रॉन प्रभावित असलेल्या देशांतून आलेल्या कोविड१९ रूग्णांचे अलगिकरणासाठी हॉटेल आणि जंबो सेंटर्सची व्यवस्था करण्यास सुरुवात केली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

तसेच दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, बोत्सवाना, मोझांबिक आणि काही मध्य पूर्व आणि युरोपीय देशांचा समावेश असलेल्या ओमिक्रॉन प्रभावित देशांतून आलेल्या लोकांचे नमुने गोळा केले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here