ऊर्जामंत्री डॉ राऊत यांचे निर्देश

@maharashtracity

मुंबई :

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील वैयक्तिक औद्योगिक घटक व औद्योगिक सहकारी संस्था यांच्यासाठी वीज दरात सवलत, पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी महावितरणला धोरण ठरविण्याचे आज ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी निर्देश दिले.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचा महासंघ यांच्यासोबत आज मंत्रालयात या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीत महासंघाचे कार्याध्यक्ष मोहन माने, उपाध्यक्ष प्रमोद कदम व सचिव गौतम गवई उपस्थित होते.

येत्या 10 दिवसात मागासवर्गीय उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवीन धोरण प्रस्तावित करण्याचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची व्याप्ती वाढवून त्यात औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांचा समावेश करण्याचे निर्देश यावेळी डॉ राऊत यांनी दिलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here