@maharashtracity

धुळे: धुळे जिल्हा परिषदेच्या (Dhule ZP) बुधवारी झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पीय सभेत सत्ताधारी आणि विरोधी गटातील सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. (ZP CEO IAS C Vanmathi) यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच सीईओंच्या विरोधात अविश्‍वास ठराव (No confidence motion) मांडण्यात आला.

परंतू, अविश्‍वास ठरावाच्या बाजूने निम्मे तर ठरावाच्या विरोधात निम्मे सदस्य असल्याने त्यांना कार्यशैली सुधारण्याची संधी देण्याच्या बोलीवर हा ठराव रद्द करण्यात आला.

विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी, यांच्या कार्यशैलीमुळे जिल्हा परिषदेतील सदस्यांमध्ये कामालीची नाराजी आहे. त्यांच्या कार्यकाळात अतिशय संथगतीने काम होत आहे. परिणामी, तीन वर्षांत जिल्ह्याचे वाटोळे झाले आहे, यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या विरोधात नाराज असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी अविश्‍वास ठराव मांडला. परंतु निम्मे सदस्यांनी पाठिंबा दर्शवला तर अन्य सदस्यांनी विरोध दर्शविला. यामुळे अध्यक्षांनी मध्यस्थाची भूमिका घेत अविश्‍वास ठराव मांडणे घाईचे होईल. त्यांना कार्यशैली सुधारण्याची संधी देेऊ असे सांगत अविश्‍वास ठरावाचा मुद्दा स्थगित केला.

यानंतर शिवाय, जि.प.सदस्य ज्ञानेश्‍वर भामरे, विरेंद्रसिंग गिरासे यांनी सीईओंच्या संथ कार्यशैलीवर जोरदार हल्ला चढविला. गिरासेंनी सीईओ यांच्या कार्यशैलीबाबत सचिवांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. सीईओंच्या कामकाजाविषयी अनेक सदस्यांनी तक्रारीतून नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here