@maharashtracity

दोन लाटांच्या उपचार अनुभवातून तिसऱ्या लाटेत म्युकरचा धोका कमीच; तज्ज्ञांचे मत

मुंबई: कोविडच्या तिसर्‍या लाटेत म्यूकरमायकोसिसचे (mucormycosis) रुग्ण आढळले नसल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून आजतागायत एमएमआर रिजनमध्ये (MMR) 987 म्युकरमायकोसिसचे रुग्ण असून यातील 294 रुग्ण मुंबई (Mumbai)शहरातील आहेत, तर 693 मुंबईबाहेर आहेत.

तर आजपर्यंत 205 लोक म्युकरमायकोसिसने दगावले असून यातील 61 मुंबईतील असल्याचे संगण्यात आले. दरम्यान, सध्या तिसरी लाट (third wave of covid) सुरू असून तिसऱ्या लाटेत म्युकरच्या संशयाने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची म्युकर विशेष टेस्ट करण्यात येते. या टेस्टमध्ये ते नेगेटिव्ह असल्याचेच समोर येत आहे.

यावर बोलताना पालिकेच्या कुपर रुग्णालयाच्या (Cooper Hospital) नाक कान घसा विभागाचे प्रमुख डॉ. निनाद गायकवाड यांनी सांगितले कि, म्युकरमायकोसिसचा संशय आल्याने बरेच जण रुग्णालयात आले. मात्र त्यांनी तपासणी करून घेतली हे योग्य आहे.

आलेल्या रुग्णांची म्युकर विशेष चाचणी करण्यात आली. ते सर्व म्युकर निगेटिव्ह असल्याचे टेस्ट मधून समोर आले. त्यामुळे सध्या एक ही म्युकर मायकोसिसचा रुग्ण दाखल नसल्याचे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात एका खासगी हॉस्पिटलमध्ये म्युकरचा रुग्ण आढळून आल्याने म्युकर पुन्हा परततो का अशी चर्चा रंगली असताना पालिका रुग्णालयातूनच म्युकर तिसऱ्या लाटेत होणार नसल्याचा अंदाज करण्यात येत आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या कालावधीत म्युकरवर करण्यात येणाऱ्या उपचार पद्धतीत बदल करण्यात आले असून त्या वेळच्या उपचार पद्धतीचा फायदा आता दिसून येत असल्याचे डॉक्टर सांगतात. तसेच लोकांनी स्वत: औषधोपचार करणे थांबवले आहे.

शिवाय, दुसऱ्या लाटेदरम्यान सर्रासपणे वापरलेल्या स्टिरॉइड्स किंवा प्रतिजैविकांचा वापर कमी केल्याने रुग्णांमध्ये घट झाली स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here