@maharashtracity

गुरुवार- शुक्रवारी ओमिक्रॉन नोंद नाही

मुंबई: राज्यात गुरुवार आणि शुक्रवारी ओमिक्रॉन (no omicron patients) नोंद नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर शुक्रवारी २,०६८ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली.

आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,५५,३५९ झाली आहे. आज ४,७०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७६,८६,६७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) ९७.८५ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २१,१५९ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी १५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७०,०१,९७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,५५,३५९ (१०.२० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३७,२५२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर ११३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत २०२ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात २०२ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण १०५४२७५ रुग्ण आढळले. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६८६ एवढी झाली आहे.

ओमिक्रॉन नोंद नाही

शुक्रवारी राज्यात ओमिक्रॉन नोंद करण्यात आली नाही. आजपर्यंत राज्यात एकूण ४४५६ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३५३१ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR Test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत एकूण ८९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी (Genome Sequencing) पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७९९१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९१३ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here