@maharashtracity

राज्यात १८,४६६ नवीन रुग्ण

मुंबईत १०६० रूग्ण नोंद

राज्यात ७५ ओमीक्रॉन बाधित

मुंबई: राज्यात मंगळवारी १८,४६६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोना रूग्ण (corona patients) संख्या वाढता वाढता वाढे असे नाईलाजाने म्हणावे लागत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,३०,४९४ झाली आहे.

काल सोमवारी ४,५५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी रूग्ण बरी होण्याची संख्या बाधित संख्येच्या ४ पटीने कमी असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१८,९१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६% एवढे झाले आहे.

दरम्यान, राज्यात मंगळवारी २० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९५,०९,२६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,३०,४९४ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३,९८,३९१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर १११० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional quarantine) आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६६,३०८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत १०६० रूग्ण नोंद

मुंबई महानगर पालिका (BMC) क्षेत्रात बुधवारी १०६० रूग्ण आढळल्याने आता मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या ६८१६९६५ एवढी झाली आहे. तर २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यू संख्या १६३८१ एवढी झाली आहे.

बुधवारी राज्यात ७५ ओमीक्रॉन बाधित

राज्यात बुधवारी ७५ ओमीक्रॉन संसर्ग (omicron) असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) रिपोर्ट केले आहेत. यात मुंबई – ४०, ठाणे मनपा- ९, पुणे मनपा – ८, पनवेल- ५, नागपूर, आणि कोल्हापूर प्रत्येकी ३, पिंपरी चिंचवड -२, भिवंडी निजामपूर मनपा, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबई प्रत्येकी १ असे असल्याचे सांगण्यात आले.

आता राज्यात एकूण ६५३ ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले. यापैकी २५९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याचे ही सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here