बेमुदत काम बंदवर परिचारिका ठाम

@maharashtracity

मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागातील परिचारिकांनी (nurses Strike) खासगीकरणाविरोधात २३ मे पासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाची शासनपातळीवर दखल घेतली जात नाही. कंत्राटीकरणाच्या प्रश्नावर संचालकांनी हात झाडले असून आंदोलनाच्या मागण्यांवर शासकीय यंत्रणेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलनकर्त्या परिचारिका संपप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता कामबंद आंदोलन सुरु करणार आहेत.

आज गुरुवारी आंदोलनाचा चवथा दिवस होता. तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी आंदोलनकर्त्या परिचारिकांनी आयुक्तांची भेट घेतली. मात्र, आयुक्तांनी कंत्राटी भरती होणार असे सांगितले. आयुक्तांचे हे उत्तर परिचारिका संघटनेला समाधानकारक वाटल नाही. तसेच प्रशासकीय बदल्यांवर बोलताना त्यात बदल करता येईल असे बोलून बाकीचे निर्णय मात्र शासनस्तरावर होणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, खासगीकरणाविरोधात आंदोलन (protest against privatisation) सुरु असल्याने खासगीकरणांवरच तोडगा निघत नसल्याने शुक्रवारपासून कामबंद आंदोलनाचा पावित्रा परिचारिका संघटनेने घेतला आहे. पुन्हा शुक्रवारी बैठका होणार असून त्यात बेमुदत काम बंद वर विचार करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना राज्य उपाध्यक्ष हेमा गजभिये यांनी सांगितले.

परिचारिकांचे आंदोलन शुक्रवारी देखील दिवसभर आझाद मैदानात सुरु होते. सार्वजनिक आरोग्य विभाग (Public health department) आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचे परिचारिका आंदोलनात सहभागी असून यापूर्वी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी परिचारिकांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. तसेच गुरुवारी रुग्णालयातील टेक्निशियन आणि समाजसेवक संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे.

परिचारिका संघटनांच्या राज्यात एकूण २७ शाखा असून २० ते २५ हजाराहून अधिक परिचारिका कामबंद आंदोलनात सहभागी आहेत. तसेच गुरूवारी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आंदोलनकर्त्या परिचारिकांची आझाद मैदानात भेट घेतली. यावेळी परिचारिकांच्या मागण्या संबंधित मंत्र्यांसमोर मांडण्यास पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन देण्यात आले, असे आंदोलनकर्त्या परिचारिकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here