मुंबईबाहेरुन आणलेल्या तयार मूर्तींच्या विक्रीसाठी मंडप परवानगीस नकार
@maharashtracity
मुंबई: गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी मूर्ती तयार करुन विक्री करणा-या मूर्तिकारांनाच तात्पुरत्या स्वरुपाचे मंडप बांधण्यासाठी व त्यामध्ये मूर्तींची विक्री करण्यासाठी महापालिकेच्या विभाग कार्यालयातून यंदाही ‘ऑफलाईन’ पद्धतीने परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, मुंबईबाहेरुन तयार मूर्ती आणून फक्त त्यांच्या विक्रीसाठी मंडप बांधण्याची परवानगी मान्य करण्यात येणार नाही, असा इशारा पालिकेने दिला आहे.
महापालिकेने मूर्तिकारांना मंडपाकरीता परवानगी देण्यासाठी सन २०२१ करीता लागू केलेले विविध स्तरीय शुल्काबाबतचे परिपत्रक पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
तसेच सदर परिपत्रक हे मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आले आहे. त्यासाठी www://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlCircuis ही लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. तरी, सर्व संबंधितांनी महापालिकेद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे पालन करुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.