@maharashtracity

टाझांनियातुन आलेली व्यक्ति धारावीत

मुंबई: कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रोन व्हेरिएंटने (Omicron variant) राज्यात एंट्री केली असून डोंबिवलीनंतर (Dombivli) आता एक कोविड पॉझिटिव्ह रुग्ण धारावीतदेखील (Dharavi) सापडला आहे.

ही व्यक्ति पूर्व अफ्रिकेच्या टांझानिया (Tanzania, East Africa) प्रांतातून आली असल्याने चिंता वाढली आहे. या व्यक्तिचा कोविड (covid) अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला. त्यामुळे त्याचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी (Genome sequencing) कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या चाचणीचा अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहे.

दरम्यान, या रुग्णावर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये (Seven Hills Hospital) दाखल करण्यात आले आहे. ओमिक्रॉन व्हेरिंयंटचा धोका ओळखून या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी सुरु असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, परदेशातून कल्याण डोंबिवलीत (Kalyan – Dombivli) आलेल्या ६ जणांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

परदेशातून आलेल्या या सहा जणांना आवश्यक त्या उपचारांसाठी विलिगीकरण कक्षात (quarantine) ठेवण्यात आले आहे. यांच्यावर उपचार केले जात आहेत. या सहा जणांपैकी ४ नायजेरियातून (Nigeria) आले होते. तर उर्वरित २ जण हे रशिया (Russia) आणि नेपाळमधून (Nepal) आले होते. त्यामुळे दिलासादायक बाब ही आहे की हे सहा जण हाय रिस्क देशातून आले नाहीत.

Also Read: पुण्यात ७ जण ओमिक्रॉनबाधित; एकूण 8 बाधित

ओमिक्रॉनचा प्रभाव असलेल्या देशांना हाय रिस्क या यादीत विभागणी करण्यात आली आहे. ओमिक्रॉनसाठी हायरिस्क देशात सध्या दक्षिण आफ्रिका (South Africa), झिंबाब्वे (Zimbabwe), बोत्सवाना (Botswana) यासारख्या देशांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईत परदेशातून आलेल्या हजारो प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. यातील मुंबईत आतापर्यंत १३ जण कोविड पॉझिटीव्ह आढळले असून ९ जण हे हाय रिस्क देशातील आहेत. या ९ जणांना कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनचा संसर्ग झाला की नाही यांची माहिती सोमवारपर्यंत कळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here