@maharashtracity

मुंबई: मुंबईत ( Mumbai) कोरोनवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने आजपासून राणी बागेचे ( Rani baug)बंद दरवाजे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत.

आज पाहिल्याच दिवशी राणी बागेत १ हजार ६२१ पर्यटकांनी हजेरी लावल्याने पालिकेच्या ( BMC) तिजोरीत ६८ हजार ७२५ रुपयांची कमाई जमा झाली आहे. यासंदर्भातील माहिती, राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी ( The director of Rani Bagh, Dr. Sanjay Tripathi ) यांनी दिली आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Pandemic) वाढल्याने महापालिका प्रशासनाने पर्यटकांबरोबरच पक्षी, प्राणी यांच्या सुरक्षिततेसाठी राणी बागेचे दरवाजे बंद केले होते.

मात्र पालिका आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून यशस्वी उपाययोजना राबविण्यात आल्याने कोरोनाची पहिली व दुसरी लाटही नियंत्रणात (Corona first wave) ( corona second wave) आली आहे. त्यचप्रमाणे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेलाही मुंबईच्या वेशिवरच रोखण्यात पालिकेला आतापर्यंत यश आले आहे.

त्यामुळे गेल्या १० महिन्यांपासून बंद असलेल्या राणी बागेचे दरवाजे पर्यटकांसाठी या आजपासून खुले करण्यात आले आहेत. आज पहिल्याच दिवशी कोरोनाच्या नियमांचे कडक पालन करीत १ हजार ६२१ पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत ६८ हजार ७२५ रुपयांची कमाई जमा झाली आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने २३ मार्च २०२० पासून देशभरातच लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी राणी बागेचे दरवाजे पक्षी, प्राणी व पर्यटक यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यावेळी बंद करण्यात आले होते.

कोरोनाची पहिली लाट नियंत्रणात आल्यावर पुन्हा १५ फेब्रुवारी २०२१ पासून राणी बाग पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती ; मात्र कोरोनाची दुसरी मोठी लाट फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने पालिकेने पुन्हा एकदा ४ एप्रिलपासून राणी बागेचे दरवाजे बंद केले होते.

मात्र आता कोरोनाची दुसरी लाटही पूर्णपणे नियंत्रणात आल्याने निर्बंधांत शिथीलता आणण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करीत मंदिरे, हॉटेल्स, बार, शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्याने आता राणी बागेचे दरवाजे १ नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहेत.

राणी बागेत तीन वर्षांखालील आणि जेष्ठांना मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश देण्यात आला नाही. तसेच, पर्यटकांना सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर सकाळी ६ ते ८.३० पर्यंत मॉर्निंग वॉकसाठी राणी बाग खुली असणार आहे. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक राहणार करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here