१ जून पासून ‘वन रुपी क्लिनिक’चा उपकम

@maharashtracity

मुंबई: कर्करोगावरील औषधोपचाराचा (cancer treatment) खर्च परवडत नसल्याने कर्करुग़्णांसाठी ‘वन रुपी क्लिनिक’ कडून (One Rupee Clinic) स्वस्त औषधे देण्याची सुरुवात १ जून पासून करण्यात येणार असल्याचे वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले (Dr Rahul Ghule) यांनी सांगितले.

२५ रेल्वेस्थानाकांवर हा उपकम सुरु करण्यात येणार असून औषधांचा खर्च कमी व्हावा यासाठी वन रुपी क्लिनिककडून स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे औषधावरील किंमतीचा भार काही प्रमाणात कमी होईल, असे डॉ. घुले म्हणाले.

दरम्यान, एका व्यक्तीने मधुमेहाची तपासणी केली असता त्या व्यक्तीच्या रक्तात मोठ्या प्रमाणात साखरेची पातळी दिसून आली. म्हणजेच सध्या नागरिकांमध्ये मधुमेहाचे (diebetic) प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून २५ रेल्वे स्थानकांवर असलेल्या वन रुपी क्लिनिकमध्ये केवळ १० रुपयात स्ट्रीपद्वारे डायबिटीसची रक्ततपासणी सुरू केली आहे.

त्याच सोबत अनेक दिवसापासून कर्करोगाच्या रुग्णांसाठी स्वस्त दरात औषधे कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील, याबाबत विचार करत असल्याचे डॉ. घुले यांनी सांगितले. तसेच औषध कंपन्यांकडून मिळणाऱ्या दरात म्हणजे ७० ते ८० टक्के सूट देऊन ही औषधे गरजू कर्करुणांना देणार असल्याचे डॉ. घुले यांनी सांगितले.

ना नफा ना तोटा या पद्धतीने ही सेवा सुरु केली जाणार आहे. आधीच महागाईमुळे लोक त्रासले आहेत. शिवाय सध्या औषधेही महाग झाली असल्याने अनेक कर्करुग्ण उपचार अर्धवट सोडतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातून हा निर्णय घेतला असल्याचे डॉ. घुले यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here