@maharashtracity

मुंबई: राज्यात रविवारी ७८२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६५,२९८ झाली आहे.

रविवारी १,३६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१०,३७६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०३ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ७२२८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात आज २ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७८,२४,८५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६५,२९८ (१०.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १,३६,४४५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ७४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत १०३ बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १०३ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आजपर्यंत मुंबईत एकूण १०५५४८१ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकुण मृत्यूची संख्या १६६९१ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here