@maharashtracity

लहान मुलांसाठी पेडियाट्रिक वॉर्ड सज्ज

मुंबई: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या (third wave of corona) पार्श्वभूमीवर गंभीर रुग्णांना ऑक्सिजन (oxygen) आणि व्हेंटिलेटरची (ventilators) आवश्यकता भासू शकते. त्यासाठी नेस्को फेज-२ मध्ये १०० बेडची व्यवस्था करण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आगामी १५ दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचे मुंबई महापालिका वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ.रमेश भारमल यांनी सांगितले.

दरम्यान, सप्टेंबरअखेरपर्यंत कोविडची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच डेल्टा प्लस (Delta Plus) बाधित रुग्ण सापडत असल्याने भविष्यात गंभीर रुग्णांची संख्या वाढवण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबईत ऑक्सिजन तसेच व्हेंटलेटर बेड वाढवण्यात येत आहेत.

अमेरिकेसह (US) युरोपमध्ये (Europe) डेल्टा प्लस बाधेने रुग्णांचे मृत्यू ओढवत आहेत. हे लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असणारे ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेड वाढवण्यात येत आहेत. यासाठी नेस्को फेज२ कोविड सेंटर उभारण्यात येत असून तेथे केवळ ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात येत आहे.

जम्बो कोविड केंद्रांमध्ये सध्या ३५०० बेडची व्यवस्था आहे. कोविड रुग्ण वाढले तर आधी कोविड केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचार केले जातील. आवश्यकता भासल्यास प्रमुख रुग्णालयाचा विचार केला जाईल. सध्या प्रमुख रुग्णालयांत केवळ ५ टक्के कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने बेड वाढवले जातील असे ही भारमल यांनी सांगितले.

तर पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत लहान मुलांसाठी पेडियाट्रिक बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रत्येक रुग्णालयात १० बेडसह तज्ञ बालरोगतज्ज्ञांचे पथक तैनात ठेवणार आहोत. जगभरातील अनुभवानुसार कोरोना लाटेत लहान मुलं लवकर गंभीर होत असल्याचे दिसते. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रमुख रुग्णालयांत पेडियाट्रिक वॉर्ड (pediatric wards) तयार करत असल्याचे ही डॉ.रमेश भारमल म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here