५० रुपयांपासून ते ८०० रुपयांच्या महागड्या पिचकाऱ्या

महागड्या पिचकाऱ्यांमुळे मुलांचा, पालकांचा हिरमोड

@maharashtracity

मुंबई: होळीच्या (Holi) ५ – ६ दिवसांपूर्वीपासूनच बच्चे कंपनी, पालकांनी रंगपंचमीसाठी (Rang Panchami) साधी पिचकारी, पिस्तुलटाईप, बॅटमॅन, सुपरमॅन यांसारख्या खेळणीस्वरूपातील पिचकाऱ्यांच्या खरेदीसाठी दादर मार्केट, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप,कुर्ला, बोरिवली, जोगेश्वरी आदी ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे दिसून येते. मात्र अगदी छोट्या पिचकाऱ्यांपासून ते मोठ्या पिचकाऱ्या किमान ५० रुपये ते ८०० रुपयांपर्यंत चढ्या दरात विक्री केली जात आहे.

ज्या पिचकाऱ्यांची किंमत अंदाजे २०० – ३०० रुपये असायला हवी. त्या पिचकाऱ्या ६०० – ८०० रुपये एवढ्या चढ्या दरात विकल्या जात असल्याने किंमत एकूणच पालक व बच्चे कंपनी यांचा हिरमोड होत आहे.

वाढत्या महागाई, इंधन दरवाढ आदी पाहता लहान मुलांच्या रंगपंचमीच्या पिचकाऱ्यांनीही उचल खाल्ल्याने मुलांना आकर्षक पिचकाऱ्या आवडल्या असतानाही पालकांना आपल्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याने महागड्या पिचकाऱ्या खरेदी न करता सध्या अथवा कमी किमतीच्या पिचकाऱ्या खरेदी करून मुलांची समजूत काढावी लागत आहे.

तर काही पालक बिचाऱ्या आपल्या एकुलत्या एक, लहान मुलासाठी, हिरमोड झालेल्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघत नाईलाजाने महागड्या दरातील पिचकाऱ्यांची खरेदी करताना दिसून येत आहेत.

मात्र यंदा मेड इन चायना सोबतच मेड इन इंडियाच्या पिचकाऱ्याही मार्केटमध्ये विक्रीला असल्याचे दिसून आले. वास्तविक, लहान मुले रंगपंचमीच्या फारफार तर ५ – ६ दिवस अगोदर पासून ते रंगपंचमी पार पडेपर्यंतच रंगपंचमीचा आनंद लुटतात . मात्र नंतर त्या कितीही महागड्या दराच्या पिचकाऱ्या असल्या तरी त्या रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवसांपासून तर कागदात, पिशवीत गुंडाळून अडगळीत, घरातील माळ्यावर, कुठेतरी कोपरऱ्यात गुंडाळून ठेवाव्या लागतात. त्यामुळे रंगपंचमीनिमित्ताने लहान मुलांची रंगपंचमी उल्हासात होते मात्र यानिमित्ताने आर्थिक भूदंड पालकांना बसतो हेच खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here