@maharashtracity

कटकारस्थान रचल्याचे कलम वाढविले

बनावट करोना लसीकरण प्रमाणपत्र प्रकरण

धुळे: बनावट करोना लसीकरण प्रकरणात अटकेत असलेल्या धुळे महानगर पालिकेच्या (Dhule Municipal Corporation) मुख्य आरोग्य अधिकार्‍यांसह चौघांना न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावली.

शिवाय, या प्रकरणात पोलिसांनी आणखी काही कलमांची वाढ केली आहे. त्यात कटकारस्थान रचणे आणि बनावट कागदपत्र बनविणे या कलमांचा समावेश आहे.

धुळे महानगर पालिकेच्या (DMC) हद्दीतील एका शाळेत लसीकरण केंद्र vaccination center) दाखवुन एका दिवसात तब्बल एक हजार 400 बनावट कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र (fake vaccination certificate) वाटप केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता.

यातून पुढे चौकशीत तीन हजार 191 बोगस लसीकरणचे प्रमाणपत्र वाटप झाल्याचे समोर आले. याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त नारायण सोनार यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

धुळे शहर पोलीस (Dhule Police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक निरीक्षक दादासाहेब पाटील, पोकॉ.सतीष कोठावदे, राहूल सोनवणे यांनी चौकशी करुन याच बनावट करोना लसीकरण प्रकरणात महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी (Health Officer) डॉक्टर महेश मोरे यांच्यासह डॉक्टर प्रशांत पाटील, परिचारक उमेश पाटील, कंत्राटी कर्मचारी अमोल पाथरे या चौघांना 15 जानेवारीला अटक केली होती.

Also Read: बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी उपायुक्तांना ताब्यात घ्या!

या चौघांची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपली. यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणात बनावट लसीकरण प्रमाणपत्र वाटप केल्याच्या कलमासह 120 ब म्हणजे कटकारस्थान रचणे (criminal conspiracy), 465, 471 बनावट कागदपत्र तयार करणे (forged documents), या कलमांचा समावेश करण्यात आला असल्याची माहीती पोलिसांनी दिली.

शिवाय, या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेतही पोलीस दलाकडून मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here