@maharashtracity
मुंबई: मुंबईत १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोस (booster dose) सुरु झाला असून २६ फेब्रुवारीपर्यंत फक्त ३ लाख ३५ हजार ७३९ जणांनी बुस्टर डोस घेतला. यातून बुस्टर डोसला प्रतिसाद कमी मिळत असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी प्रतिसाद कमी असल्याचा मुद्दा खोडून काढला. नऊ महिन्यानंतर आणि बूस्टर डोस घेण्याआधी तीन महिने कोविड (covid) संसर्ग झाला नसल्याचा निकष बूस्टर डोससाठी असल्याचा काकाणी यांनी स्पष्ट केला. या दोन निकषात बसणारे लाभार्थी कमी प्रमाणात असल्याने बूस्टर डोस प्रतिसाद धीम्या गतीने असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान १० जानेवारीपासून बुस्टर डोसच्या लसीकरणास सुरुवात झाली. १० जानेवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत ५७ हजार ९०१ हेल्थ केअर वर्कर्सने (Healthcare workers) बुस्टर डोस पूर्ण केला. तर सोमवारपर्यंत ६० हजार ९४ पूर्ण झाले. तसेच ७८, हजार ९३० फ्रंट लाईन वर्कर्स (Frontline workers) तसेच ६० वर्षांवरील १ लाख ९८ हजार ६६७ जणांनी बुस्टर डोस घेतला असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण मोहिमेला (corona vaccination drive) सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कस, फ्रंट लाईन वर्कस त्यानंतर जेष्ठ नागरिक (senior citizens) असे अनेक टप्पे ठरविण्यात आले. यातील कोविड लसीकरणानंतर ९ महिने पूर्ण झालेल्यानाच बुस्टर डोस देण्यात येत आहे. त्यातून फार कमी जणांचा हा कालावधी निकष पूर्ण होत आहे.
दिनांक २१ डिसेंबरनंतर मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Third wave of corona) रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. मात्र योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे तिसरी लाट परतवण्यात पालिकेला यश आले. त्यानंतर कोरोना काळात जीवाची बाजी लावत काम करणाऱ्या हेल्थकेअर वर्कस तसेच फ्रंट लाईन वर्कस व जेष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली.
दिनांक १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. मात्र, गेल्या दीड महिन्यात प्रिकॉशन डोस घेण्यास हेल्थ केअर वर्कस, फ्रंट लाईन वर्कसचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.