@maharashtracity

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तसेच स्व-उपचाराचे दुष्परिणाम

मुंबई: पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांवर (corona patients) उपचार करण्यात आले. मात्र उपचारानंतर काही रुग्णांकडून आतड्यासंबंधित विकारांच्या (intestinal disease) तक्रारी करण्यात आल्या होत्या. आतड्यांच्या या तक्रारी अद्यापही सुरु असून ओमिक्रोनच्या (Omicron) लाटेत त्या अधिक प्रमाणात केल्या जात असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

उपचारानंतर ओमिक्रॉनमधून रुग्ण मुक्त होत असले तरी ओमिक्रोन बाधित असताना तसेच ओमिक्रोन मुक्त झाल्यावर देखील आतड्या संबंधित विकाराच्या तक्रारी केल्या जात आहेत. अतिसार, डोकेदुखी, पोटदुखी ही ओमिक्रोनची लक्षण असून रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून अँटिबायोटिक्सचे (antibiotics) अतिसेवन केले असल्यास आतड्यांवर दुष्परिणाम होत असल्याचे राज्य कोरोना टास्क फोर्स (corona task force) सदस्य डॉ. अविनाश सुपे (Dr Avinash Supe) यांनी सांगितले.

पुढे बोलताना डॉ. अविनाश सुपे म्हणाले कि, काही वेळा आतड्यांच्या तक्रारी कोरोनाची लक्षण ठरली आहेत. त्यामुळे पोटदुखी, अतिसार आदी विकार कोरोना संसर्गात नव्या नाहीत. सध्या सुरु असलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंट संसर्गादरम्यान आतड्यांच्या विकारांच्या तक्रारी होत आहेत. अनेकांना जुलाब, उलटी, अंगदुखी, डोकदुखी सारख्य तक्रारी करत आहेत.

ही ओमिक्रॉनमधील लक्षणच आहेत. शिवाय उपचारातूनसुद्धा आतड्यांच्या विकार उद्भवू शकतात. बहुतांश रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स घेत असतात. अँटिबायोटिक्सच्या अतिसेवनाने देखील डायरिया होत असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.

सध्या ओमिक्रॉनची लक्षण जरी सौम्य असली तरी देखील कोरोनातील व्हेरियंट असल्याने त्यातून लवकर बरे होण्यासाठी रुग्णांचे आणि डॉक्टरांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या तक्रारीमध्ये आतड्याच्या समस्या, तत्सम तक्रारी रुग्णांकडून केल्या जात आहेत.

दरम्यान, आतड्याच्या विकारात पोटातील आम्ल (acid) वारंवार अन्ननलिकेत पुन्हा येते. यातून आतड्याचे विकार, मूळव्याध सुद्धा उद्भवत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. कोरोना तसेच ओमिक्रॉनच्या उपचारादरम्यान एकाहून अधिक औषध वापरल्याने त्यातून हा दुष्प्रभाव होत असल्याचे सांगण्यात आले.

उपचाराच्या औषधात स्टेरॉइड्स (steroids), अँटीव्हायरल (anti-viral), अँटी-फंगल (antifungal), अँटीबायोटिक्ससारख्या अति वापरामुळे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच उपचार केल्यास पचनसंस्थेवर (digestive system) गंभीर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

झन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. रॉय पाटणकर यानी सांगितले की, कोविड महामारीच्या काळात रुग्णांमध्ये आतड्यांच्या तक्रारीत वाढ झाली. यात उलट्या, भूक न लागणे, मळमळ, अतिसार आणि पोटदुखी अशा होत्या. मात्र पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेत या तक्रारी कमी प्रमाणात होत्या. सध्या तिसऱ्या लाटेत त्या वाढल्याचे डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

बैठी जीवनशैली, तेलकट आणि भेसळयुक्त अन्न खाणे, व्यायामाचा अभाव, भीतीपोटी अशी कारण असून कित्येक वेळा स्वतःच स्वतःवर केलेले उपचार देखील कारण असल्याचे डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here