मराठा संघटनांचे ठिय्या आंदोलन
@maharashtracity
धुळे: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी शनिवारपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला धुळे जिल्ह्यातील मराठा समाजाने पाठींबा दिला आहे.
शनिवारी सकाळपासूनच शहरातील क्युमाईन रोडवर मराठा क्रांती मोर्चा, मिरच्या मारूती पंच मंडळ, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा युवक मंडळ, वधू-वर पालक परिचय समिती, क्षत्रिय मराठा संघटना, दखणी मराठा संघटना, कुणबी मराठा संघटना, मराठा महिला मंडळ या वेगवेगळ्या मराठा समाजातील संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरु केले.
खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे मुंबईत आमरण उपोषण सुरू केले असतानाच धुळे शहरात पहिल्या दिवसाची सुरूवात वारकरी मंडळींनी भजन गावून केली. तर भारूड, बहुरूपींनी आपली कला सादर करीत या आंदोलनात रंग भरले. नेरचे पोतदार त्र्यंबक जगदाळे यांनीही आपल्या कलेतून आरक्षण प्रश्नी दिरंगाई करणार्या राज्यकर्त्यांवर शाब्दीक आसूड ओढले.
या आंदोलनात मराठा क्राती मोर्चाचे जिल्हाघ्यक्ष मनोज मोरे, रणजित भोसले, अतुल सोनवणे, शितल नवले, संजय गायकवाड, जगन ताकटे, भोला वाघ, वाल्मिक मराठे, अमर फरताडे, अशोक सुडके, संदीप सूर्यवंशी, रजनिश निंबाळकर, विक्रमसिंह काळे, सुशिल ठाणगे, विनायक सरोदे, रमाकांत शेणगे आदी समाजबांधव सहभागी झाले होते.