आले सौदे बंद पाडले

@maharashtracity

पुणे: आले उत्पादक शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी सातारा, सांगली व पुणे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) पदाधिकाऱ्यांच्यावतीने धडक मारण्यात आली. संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे, विभागीय अध्यक्ष प्रकाश बालवडकर, युवा प्रदेश अध्यक्ष अमर कदम यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मंगळवारी पहाटे मारण्यात आली.

पहाटे तीन वाजता सर्व कार्यकर्ते व शेतकरी पुणे बाजार समितीमध्ये (Pune APMC) घुसले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, एकच गट्टी – राजू शेट्टी, आले उत्पादकांची लूट थांबलीच पाहिजे, आलेची खरेदी – विक्री सरसकट झाली पाहिजे, वर्गवारी न करता सौदे झाले पाहिजेत, जुने – नवे आले एकत्रच खरेदी करावी, अशी मागणी करण्यात आली अणि जोरदार घोषणा करण्यात आल्या.

ज्या व्यापाऱ्यांनी (traders) वर्गवारी करून आले (Ginger) खरेदी केले होते, ते दोन टन आले जप्त करून यावेळी बाजार समितीच्या हवाली करण्यात आले. तसेच या पुढे कोणत्याही व्यापाऱ्याने स्वतंत्र प्रतवारी करून खरेदी केल्यास त्या व्यापाऱ्याला बदडून काढू, असा इशारा पवार आणि खराडे यांनी दिला.

यावेळी सातारा (Satara) युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, खटाव तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे यांनी जवळपास 2 टन प्रतवारी केलेले आले एकत्र करून मार्केट कमिटीच्या स्वाधीन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here