@maharashtracity

मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

पुण्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधांवर जन आरोग्य अभियानाकडून टिका

मुंबई: राज्यातून कोविडला उतरती कळा लागली (covid under control) असताना आतापर्यंतच्या रुग्ण आणि मृत्यू संख्येचा लेखाजोखा आरोग्य विभागाकडून मांडण्यात येत आहे. गेल्या अठरा महिन्याच्या कोरोना काळात कोविडचे रूग्ण आणि मृत्यू पुण्यात सर्वाधिक झाले असल्याचे समोर येत आहे. (Study reveals Pune recorded highest deaths due to covid)

पुणे जिल्ह्यात शनिवारपर्यंत १.१ दशलक्षाहून अधिक कोविडचे रूग्ण नोंदविण्यात आले. तर १९,५०० हून अधिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

पुण्यात झालेल्या सर्वाधिक मृत्यूच्या कारणांवर तज्ज्ञ अभ्यास करत असून २००९ च्या एच१एन१ उद्रेकाशी साम्य असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. मात्र, पुण्यात वैद्यकीय पायाभूत सुविधा कुमकुवत (Poor health infrastructure in Pune) असल्याचा आरोप जन आरोग्य अभियानाकडून (Jan Arogya Abhiyan) केला जात आहे.

दरम्यान, पुण्याच्या पाठोपाठ मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू नोंदविण्यात आले. मुंबईत ७५६,४४१ हून अधिक रूग्ण तर १६,२४४ हून अधिक मृत्यू नोंदविण्यात आले. मुंबईच्या (Mumbai) तुलनेत पुण्यात सुरुवातीला कोरोना संसर्ग धीम्या गतीने पसरत होता. मात्र नंतर वेगात प्रसार होऊन मुंबईहून अधिक रूग्ण आढळू लागले असल्याचे राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

मुंबई आणि पुण्याच्या संसर्गातील फरक सांगताना पुण्यातील संसर्गात एच१एन१ (H1 N1) संसर्गाप्रमाणे लक्षण आढळून येत असल्याचे डॉ. आवटे म्हणाले. सध्या राज्यात थंडीची सुरुवात असून पुण्यातील दिवसाच्या आणि रात्रीच्या वातावरणात फरक आढळून येत असल्याने आम्ही यावर लक्ष ठेऊन असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पुण्यातील कोरडे हवामान कोविडसारख्या आजाराला अनुकूल असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांनी मांडले. जिल्ह्यातील हवामानानुसार विषाणू वाढत असल्याच्या अंदाजावर अभ्यासाची गरज असल्याचे मत देखील त्यांनी मांडले.

मात्र, जन आरोग्य अभियानाचे डॉ. अभिजित मोरे यांनी पुण्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधावर टीका केली आहे. कोणत्याही साथरोगाचा संबंध स्थानिक हवामानाशी नक्की जोडू शकतो. मात्र त्याच वेळी महामारी सारख्या स्थितीला तोंड देणाऱ्या सुविधा नसल्याने संसर्ग आणि मृत्यू वाढले आहेत, असे ते म्हणाले.

कोरोना संसर्ग प्रखर असताना पुण्यात सार्वजनिक विभागात एकही वैद्यकीय अतिदक्षता विभाग नव्हता. तसेच पुण्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (Contact tracing) करण्याच्या उपाययोजना अत्यंत ढिसाळ होत्या. या सुविधा देखील पुढे जाऊन दाखल होणाऱ्या रुग्णांना बेड वाटप करण्याच्या योजना अयशस्वी झाली असल्याचे दिसले असेही डॉ. मोरे म्हणाले.

पुण्याच्या तुलनेत मुंबईच्या प्रत्येक २४ वॉर्डात २४ वॉर रूम (War room) स्थापन करण्यात आले. तर मुंबईत पालिका २४ वॉर्ड पातळीवर २४ वॉर रूम तयार करण्यात आले होते. मुंबई मॉडेलपासून (Mumbai Model) शिकून पुण्यातील अधिकाऱ्यांनी रणनीती आखणे गरजेचे होते. ते तसे न केल्याने पुढे पुण्यात गंभीर स्थिती उद्भवली असल्याचे डॉ मोरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here