uddhav

@maharashtracity

मुलांचे लसीकरण अन् नव्या औषधांच्या उपलब्धतेची माहिती ठेवा

मुंबई: दिनांक २२ ऑक्टोबरपासून चित्रटगृहे सुरु होत असताना ऍम्युझमेंटपार्क देखील खुले करण्यात येणार आहेत. मात्र, सवलत देत असताना सर्व सामान्य नागरिकांमध्ये कोविड वर्तणुकीची जागृकता सतत करण्यात यावी, अशी सुचना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. (CM Uddhav Thackeray emphasis on awareness about covid rules)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोरोना टास्क फोर्स, लहान मुलांच्या टास्क फोर्स सदस्य यांच्यात वर्षा निवासस्थानी आगामी देण्यात येणाऱ्या सवलतींवर चर्चा करण्यात आली.

मुलांचे लसीकरण आणि जगभरात कोरोनावरील उपचारांवर नवनवीन प्रयोग होत असून नवीन औषधांची परिणामकारकता, किंमत आणि उपलब्धता याची माहिती घेणे आत्तापासूनच सुरुवात करावी, असेही त्यांनी या बैठकीत सुचवले.

Also Read: अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे ‘राष्ट्रवादी’चे प्रयत्न – केशव उपाध्ये

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढवण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. यासोबत २२ ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या पण कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे बैठकीत ठरले.

पार्कातील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी कोविड व्यतिरिक्त डेंग्यू , चिकनगुनिया आजाराच्या रुग्णात मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री म्हणाले, हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होतांना दिसते आहे. २२ ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे (theatre), नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांची देखील वेळ वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुलांच्या लसीकरणासंदर्भात (vaccination of children) केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेऊन त्याप्रमाणे लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आल्या. दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका (third wave of corona) अद्याप असल्याने नियमित मास्क (mask) घालणे, सुरक्षित अंतर पाळणे (physical distance) व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here