मंकिपॉक्स संदर्भात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे विधान

@maharashtracity

मुंबई: जगातील १२ देशात मंकिपॉक्स संसर्ग (monkey Pox virus) पसरला असून युके (UK), युएससारख्या (USA) देशात याचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, भारतात मंकिपॉक्सचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखी स्थिती नसल्याचे सांगून सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी बुधवारी आश्वस्त केले. दरम्यान, संबंधित देशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या विमानतळावरच केल्या जात असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.

टोपे पुढे म्हणाले की, या विषाणूचा हवेतून प्रसार न होता मानवाकडून मानवाला किंवा प्राण्याकडून मानवाला असा प्रसार होत आहे. याची लक्षणे पुरळ येणे, ताप येणे अशी आहेत. दोन आठवड्यापर्यंत शरिरात संसर्ग राहू शकते. याचा मृत्यूदर १ टक्क्यापासून १० टक्क्यांपर्यंत असल्याचे अभ्यास अहवाल सांगतात.

साधारणपणे एक ते दोन दिवसात ताप आणि पुरळ येण्याच्या दिवसात संसर्ग पसरु शकतो. यातून जनतेने सावध व्हावे. मात्र काळजी करण्याचे कारण नसून संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरु आहेत. संसर्गित देशातून येणाऱ्या प्रवाशांना तपासण्याचे काम विमानतळावर सुरु आहे. या ठिकाणी अशी कोणतीही संबंधित लक्षणे आढळल्यास त्याचे स्वाब घेऊन नॅशनल इान्स्टि्युट ऑफ वायरॉलॉजी संस्थेकडे (NIV) पाठविण्यात येत आहेत. या अहवालानंतर आजाराबाबत ठरविण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये (Kasturba Hospital) स्वतंत्र वॉर्ड तयार केला आहे. शिवाय स्वतंत्र डॉक्टरही लक्ष ठेवून आहेत. ही पूर्व तयारी आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात पुरळ आणि ताप असलेल्या रुग्णांचे स्वाब नमुने घेण्याच्या सुचना करण्यात आल्या असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here