मुंबई
रणबीर कपूर सध्या आपला नवा चित्रपट ‘एनिमल’ साठी चर्चेत आहे. चित्रपटातील अभिनयासाठी रणबीरचं कौतुक केलं जात आहे. बॉक्स ऑफिसवर ही चित्रपट चांगली कमाई करीत आहे. एनिमलला मिळालेल्या यशानंतर आता रणबीर कपूर लवकरच आपल्या नव्या प्रोजेक्टच्या तयारीत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटात रणबीर भूमिका साकारणार आहे.
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने रणबीर कपूरने रामायणसाठी चित्रीकरण सुरू करीत असल्याचा दावा केला आहे.
रामायणाचं चित्रीकरण कधीपासून होणार सुरू?
एका वापरकर्त्याने एकामागून एक अनेक वेळा ट्विट करून सांगितलं की, तो अलीकडेच विमानतळावर रणबीर कपूरला भेटला आणि अभिनेत्यासोबत आगामी चित्रपट रामायणबद्दल चर्चा झाली. युजरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “इमिग्रेशन लाईनमध्ये रणबीर कपूरसमोर उभे राहणे आणि अॅनिमल आणि त्याच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल बोलणे याचा मी या ट्रिपमध्ये विचार केला नव्हता!”
रामायण’मध्ये रणबीर कपूर साकारणार रामाची भूमिका
नितीश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर रामाची भूमिका साकारणार आहे, तर सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीला कास्ट करण्यात आले आहे. याआधी सीतेच्या भूमिकेसाठी आलिया भट्टसोबत चर्चा सुरू होती, मात्र तारखांशी संबंधित मुद्द्यांमुळे तिला या चित्रपटात काम करणं शक्य झालं नाही. दरम्यान, KGF स्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारू शकतो.