राज्यात अतिवृष्टी व मुसळधारेचा इशारा

@maharashtracity

मुंबई: काही वातावरणीय बदलामुळे मान्सून (monsoon) अधिक सक्रीय झाला आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून मध्य प्रदेश (MP) राज्याच्या मध्यवर्ती भागावर कमी दाबाचे क्षेत्र (low pressure belt) निर्माण झाले आहे. वातावरणीय बदलामुळे गुजरात किनारपट्टीपासून महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत मान्सून सक्रियतेचे पुरक वातावरण निर्माण झाले आहे. यातून आगामी पाच दिवस कोकण किनारपट्टीसह (coastal Konkan) मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्र प्रमुख जयंत सरकार यांनी सांगितले.

मध्यप्रदेश राज्यावरील कमी दाबाचा पट्टा, गुजरात (Gujarat) किनारपट्टीपासून ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत घुमणारे गतीशील वारे अशा तीव्र मान्सून पोषक वातावरणामुळे मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. यातून ९ जुलैपर्यंत मुंबईसह संपुर्ण कोकण किनारपट्टीवर तसेच मध्य महाराष्ट्रावर मुसळधार ते अतिवृष्टीचा (heavy rain) इशारा देण्यात आला आहे.

या अलर्टनुसार ८ जुलै रोजी उत्तर कोकणातील पालघर जिल्हयासाठी रेड अलर्ट तर ६, ७ आणि ९ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच ६, ७, ८ आणि ९ जुलै रोजी मुंबई, ठाणे या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दिवसात मुंबई- ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच ६ ते ८ जुलै दरम्यान रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हयांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर पुढे ९ जुलै रोजी रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तर ६ ते ८ जुलै दरम्यान कोल्हापूर आणि सातारा जिल्हयांना रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या जिल्हयांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक जिल्हयांना ६ ते ८ जुलै दरम्यान ऑरेंज अलर्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here