एएफडीएलएच फाऊंडेशनचे सर्व्हेक्षण

मुंबई: गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात सर्दी खोकला आणि ताप अशा वायरल आजाराच्या प्रतिबंधात्मक औषधांच्या विक्रीत घट झाली आहे.

औषध विक्रेत्यांची संघटना ऑल फूड एण्ड ड्रग लायसन्स हॉल्डर्स फाऊंडेशनच्यावतीने मार्च-एप्रिल- मे अशा तीन महिन्यात सर्दी-खोकल्याच्या औषधांच्या विक्री बाबत औषध विक्रेत्यांकडून सर्व्हेक्षण केले. यात वायरल आजारांच्या औषधांची ४० टक्क्यांनी घट झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. लसीकरणातून शरिरात रोग प्रतिबंधात्मक शक्ती निर्माण झाली असल्याने वायरल आजारांच्या औषधात घट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या सर्वेक्षणात औषध कंपन्या, औषध विक्रेते अशा १०१ जणांनी सहभाग घेतला. सहभागी झालेल्या १०१ पैकी ७३ जणांनी सर्दी खोकल्याची औषधांच्या विक्रीत घट झाली असल्याची नोंद केली. सर्दी खोकला प्रतिबंधात्मक औषधांची मागणी न झाल्याचे माहिती सर्वेक्षणातून समोर येत आहे.

यावर बोलताना ऑल फूड एण्ड ड्रग लायसन्स हॉल्डर्स फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले की, लसीकरणाला सुमारे दीड वर्ष पूर्ण झाले आहे. या दीड वर्षाच्या कालावधीत दोन डोस तसेच काहींनी बूस्टर डोसही पूर्ण केला आहे. यामुळे त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. यातून सर्दी-खोकल्याच्या औषधांची विक्री घटली असल्याची शक्यता पांडे यांनी व्यक्त केली. दरम्यान, तोंडावर आलेल्या पावसाळ्यातही असे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचे पांडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here