@maharashtracity

विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करणार

जिल्हाधिकार्‍यांच्या सूचना

धुळे: धुळे जिल्ह्यासह शहरातील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा 27 जानेवारीपासून तर पुढील आठवड्यापासून पहिलीपासून आठवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार या शाळा सुरु होणार आहेत.

शासनाने शाळा व महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, स्थानिक प्रशासन याबाबत निर्णय घेणार असल्याचेही शासनाने म्हटले आहे. त्यानुसार शाळा सुरू करताना (reopening of school) शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस शंभर टक्के पूर्ण झालेले असावेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण (vaccination) प्राधान्याने करावे, याकरिता मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्‍चित केली आहे.

तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नियमित शाळांना भेटी देऊन त्याचा अहवाल प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्याचे आदेश दिले आहे.

मनपा शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आयुक्त देविदास टेकाळे (DMC Commissioner Devidas Tekale) यांनी 21 रोजी आढावा बैठक घेतली. त्यात सर्व संबंधितांना शाळा सुरू करण्याबाबत सूचना देत अनुमती दिली आहे. त्यानुसार 27 जानेवारीपासून महापालिका क्षेत्रातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्याची माहिती मनपा प्रशासन अधिकारी महेंद्र सोनवणेंनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here