@maharashtracity

मुंबई: राज्य सरकार विरोधात दिनांक १ ऑक्टोबर पासून राज्यस्तरीय बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा पुनरुच्चार राज्यातील निवासी डॉक्टरांनी केला आहे.

निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन सरकारकडून वारंवार देऊनही त्याची पूर्तता होत नसल्याने निवासी डॉक्टरांनी काम बंदची भुमिका घेतल्याचे मध्यवर्ती मार्ड कडून सांगण्यात आले. राज्यातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. (more than 5 thousand doctors will go on strike)

दरम्यान, १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी सांगितले.

आंदोलनात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काम करणारे एम. डी., एम. एस. आदी डॉक्टरही सहभागी होणार आहेत.

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून शुल्क माफीचे आश्वासन काही महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. पण, ते पाळले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यावेळी राज्यस्तरीय बेमुदत काम बंद आंदोलन असले तरी डॉक्टर आपली सेवा बजावणार आहेत.

Also Read: प्रसूतिगृहात दाखल महिलेचा मृत्यू

गंभीर, आपात्कालीन आणि अतिदक्षता (Emergency services and ICU will remain functional) विभागातील रुग्णांवर उपचार सुरू ठेवले जाणार आहेत, असे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे (MARD president Dr Dnyaneshwar Dhobale) पाटील यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here